Jump to content

आतिफ अस्लम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुहम्मद आतिफ अस्लम

आतिफ अस्लम
स्वाक्षरी
स्वाक्षरी

मुहम्मद आतिफ अस्लम[१] (जन्म १२ मार्च १९८३[२]) 'एक पाकिस्तानी गायक आणि चित्रपट अभिनेता आहे. त्याने २०११मध्ये 'बोल' नावाच्या सामाजिक नाटकतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. तो 'व्होकल तंत्रासाठी ' प्रसिद्ध आहे. अस्लम हा सर्वात तरुण Tamgha-e-Imtiaz,(एक पाकिस्तानी पुरस्कार) प्राप्तकर्ता आहे.२००८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना हा पुरस्कार दिला.

जीवन[संपादन]

अस्लम ह्याचा जन्म पंजाबी कुटुंबात पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे झाला. त्याने त्याच्या शिक्षणाची सुरुवात लाहोर येथील किंबर्ले हॉल स्कूल (अंगणवाडी), येथून केली. पुढे त्याने सन १९९१पासून रावळपिंडी येथील सेंट पॉलच्या केंब्रिज शाळेमथून शिक्षण घेतले. १९९५ मध्ये अस्लम लाहोर येथे परतला व तेथे त्याने विभागीय सार्वजनिक शाळेत अभ्यास चालू ठेवला. त्याने पाकिस्तानातील पंजाब इन्स्टिट्यूट आॅफ कॉंप्युटर सायन्स येथून पदवी घेतली.

अस्लमला क्रिकेट आणि संगीतात रस होता. नुसरत फतेह अली खान आणि अबिदा प्रवीण यांची गाणी अस्लम आवडीने ऐकत असे. त्याचे पहिले प्रेम क्रिकेट होते व तो नेहमी देशाचा क्रिकेट खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व कारण्याचे स्वप्न बघत असे. तो एक जलदगती गोलंदाज होता आणि त्याची खेळाची आवड पाहता तो राष्ट्रीय १९ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेटच्या संघ चाचण्यांमध्ये निवडला गेला होता. येथे पहिल्या टप्प्यात अस्लम हा, यू-१९ विश्वचषकासाठी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत होता. .[ संदर्भ हवा ]


[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

  • "व्यक्तिगत माहिती : आतिफ अस्लम ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील व्यक्तिगत माहितीचे पान" (इंग्लिश भाषेत). 2019-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)