Jump to content

इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड द टेम्पल ऑफ डूम या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम
दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग
निर्मिती लुकासफिल्म
कथा जॉर्ज लुकास
प्रमुख कलाकार हॅरिसन फोर्ड, अमरीश पुरी, केट कॅपशॉ, के हुय क्वान, रोशन सेठ
संकलन मायकेल काह्न
छाया डग्लस स्लोकोम्ब
संगीत जॉन विल्यम्स
देश अमेरिका
श्रीलंका
भारत
भाषा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
प्रदर्शित १९८४
अवधी ११८ मिनिटे
निर्मिती खर्च २ कोटी ८२ लाख अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ३ कोटी ३३ लाख अमेरिकन डॉलर
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ



इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम हा १९८४मध्ये प्रदर्शित अमेरिकन थरारपट आहे. जॉर्ज लुकासच्या कथेवर स्टीव्हन स्पीलबर्गनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. इंडियाना जोन्स चित्रपट मालिकेतील हा दुसरा चित्रपट आहे. याचे कथानक इंडियाना जोन्स अँड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क या पहिल्या चित्रपटाच्या कथेच्या आधी घडते. या चित्रपटात हॅरिसन फोर्ड, केट कॅपशॉ, अमरीश पुरी, रोशन सेठ, फिलिप स्टोन आणि के हुई क्वान यांनी भूमिका केल्या आहेत.

कथानक

ब्रिटिश भारतातील एका गावात कालीदेवतेची पूजा करणाऱ्या ठगी पंथाने थरथराट माजवलेला आहे. बाल गुलामगिरी, काळी जादू आणि नरबळी देणाऱ्या या टोळक्यापासून वाचविण्यासाठी गावकरी इंडियाना जोन्सला साकडे घालतात व तो ठगांचे ठाणे नेस्तनाबूद करून तेथील लहान मुलांना सोडवतो.

अमरीश पुरी खलनायक मोला रामच्या भूमिकेत होते. स्पीलबर्गने नंतर टिप्पणी केली "अमरीश हा माझा आवडता खलनायक आहे. हा जगातील सर्वोत्तम खलनायक आहे." [१]

वाद[संपादन]

या चित्रपटातील भारताचे चित्रण वादग्रस्त ठरले. भारतात चित्रपटावर तात्पुरती बंदी घातल्याने हा चित्रपट येथील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. कालांतराने हा चित्रपट व्हिडीयो वर प्रदर्शित झाला. [२] [३] [४]

चित्रपटात दाखविलेले भारतीय खाद्यपदार्थांवरून टीकेचे वादळ उठले होते. चित्रपटातील भारतीय माणसे सापाची पिल्ले, डोळ्यांचे सूप, किडे आणि माकडाचा मेंदू खाताना दाखवले आहेत. हे पाहून भारतात असेच खाणे प्रचलित आहे असे अनेक ठिकाणी शिकवत जात असल्याचे दिसून आले.[३] [५] याशिवाय चित्रपटातील व्हाइट सेव्हियर कथानकाबद्दलही टीका झाली. भारतातील गरीब बिचारी जनतेला गोरा नायक अचानक येउन त्यांचा तारणहार ठरतो असे दाखविले गेले आहे.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Steven Spielberg once called this Bollywood legend 'world's best villain' even after he refused to audition for him".
  2. ^ Gogoi, Pallavi (November 5, 2006). "Banned Films Around the World: Indiana Jones and the Temple of Doom". BusinessWeek. April 1, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 1, 2007 रोजी पाहिले.
  3. ^ a b Rosser, Yvette. "Teaching South Asia". Missouri Southern State University. January 8, 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 27, 2008 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Yvette Rosser" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ "The Spokesman-Review".
  5. ^ Ramnath, Nandini (March 31, 2016). "'Temple of Doom' is the Indiana Jones movie that Indians won't forget in a hurry". Scroll.in. November 21, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 30, 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "We need to talk about Indiana Jones and the Temple of Doom". Little White Lies. June 20, 2020. June 2, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 30, 2021 रोजी पाहिले.