Jump to content

ओमाहा बीच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मृत्यूच्या जबड्यात - ओमाहा बीचवर चालून जाणारे १ल्या पायदळी सैन्यातील अमेरिकन सैनिकांचे रॉबर्ट एफ. सार्जंटने काढलेले छायाचित्र.

ओमाहा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी एक असलेला हा प्रदेश ८ किमी लांबीची मोठी पुळण आहे.

६ जून, इ.स. १९४४ रोजी अमेरिकन सैन्य येथे मोठ्या संख्येने उतरले व तेथील तटबंदीवर हल्ला करीत पुळण हस्तगत केली. त्यानंतर त्यांना पुढे सरकणे कठीण झाले. युटा बीच आणि गोल्ड बीच यांमधील कडी असलेल्या ओमाहा बीचवरील सैन्याने मोठी जीवितहानी पत्करत त्या दिवशी संध्याकाळपर्यंत दोन छोटी जर्मन ठाणी हस्तगत केली व नंतरच्या दिवसांत एकएक करीत अधिक बलाढ्य ठाणी उद्ध्वस्त करीत ते आत घुसले.