कालका−सिमला रेल्वे
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d9/KSR_Steam_special_at_Taradevi_05-02-13_56.jpeg/250px-KSR_Steam_special_at_Taradevi_05-02-13_56.jpeg)
कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची सुरुवात होते. हिमालय पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे कालका ते सिमला दरम्यानचे ९६ किमी अंतर सुमारे ५ तासांमध्ये पार करते.
इ.स. १८९१ साली दिल्ली कालका रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर १८९८ साली कालका−सिमला मर्गाचे बांधकाल सुरू करण्यात आले. सिमला हे ब्रिटीश राजवटीचे उन्हाळी राजधानीचे शहर होते. १९०३ साली लॉर्ड कर्झनच्या हस्ते कालका−सिमला रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. १९७१ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००८ साली युनेस्कोने दार्जीलिंग हिमालयन रेल्वे व निलगिरी पर्वतीय रेल्वेसह कालका−सिमला रेल्वेचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)