Jump to content

चाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चाक हे वर्तुळ आकाराचे असते व स्वतःभोवती फिरणारे असते. याचा शोध मानवी विकासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा एक मूलगामी यांत्रिक शोध आहे. याचे स्वरूप अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारे चक्र असे आहे.

तीनचाकी सायकलचे चाक.

चाकाच्या शोधामुळे मानवाला कमी शक्ती वापरून अधिक कार्य साधणं शक्य झाले.

ओळख[संपादन]

इतिहास[संपादन]

इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमिया येथे मातीची भांडी बनवणाऱ्या चाकाचे अस्तित्व आढळले आहे. प्राचीन इजिप्तमध्ये इ.स. पूर्व २००० वर्षं चाकांचे रथ वापरले गेले असावेत असे मानले जाते.

भारत[संपादन]

प्राचीन भारतीय रथ बनवत असत. युद्धात रथांचा वापर होत असे. रथकार हे ऋभू होते असं म्हटलं जातं. ऋभूंनी एक रथ बनवून तो अश्विनींना दिला असं वर्णन ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृति कोशात चाकाचे भाग पुढील प्रमाणे नोंदलेले आहेत - पत्री (धातूची धाव), प्रधी (घेर), वर्तुळ (मुख्य चाक), अर (आरे), नभ्य (तुंबा) आणि अक्ष (म्हणजे आस).

कार्य[संपादन]

पर्याय[संपादन]

चित्र प्रदर्शन[संपादन]