Jump to content

नवरोजी वकील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर नवरोजी वकील ह्यांचे नाव मुंबई येथील पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या जगन्नाथ पथ आणि नाना शंकरशेट पथ च्या पुढे असलेल्या मार्गाला दिलेले आहे.

बालपण[संपादन]

सर नवरोजी वकील ह्यांचा जन्म दिनांक १४ नोव्हेंबर १८४० रोजी सुरत येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पेस्तनजी होते. त्यांच्या आईचे नाव बचूबाई होते. त्यांचे कुटुंब सन १८१४ मध्ये सुरतवरून अहमदाबाद येथे आले.नवरोजींचे शिक्षण छगन बाप्पा मेहता शाळेत झाले. शाळेत असताना त्यांना युरोपच्या नकाशावर डँन्युब नदी योग्य प्रकारे दाखवता आली नाही आणि त्यांना शिक्षा झाली.नवरोजी ह्यांचे आजोबा नवाब आणि डच ह्यांचे दुभाषी होते.त्यावरून त्यांच्या कुटुबाला वकील हे नाव पडले.

दानशूर व्यक्तिमत्त्व[संपादन]

त्यांनी इमारत दुरुस्ती आणि रस्ते बांधकाम सुरू केले आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यापार वाढविण्यासाठी त्यांनी पर्शियन, इंग्रजी, अरेबिक, फ्रेंच भाषा शिकल्या. त्यांना अहमदाबाद ते बडोदा रेल्वे लाईन टाकण्याची जबाबदारी मिळाली. राजपुताना, माळवा, सेवालीया, गोध्रा, पालनपूर, खाराघोडा अश्या अनेक रेल्वे लाईन्स बनविल्या.पश्चिम रेल्वे वरील नायगाव रेल्वे स्थानक आणि वसई रेल्वे स्थानक ह्या ठिकाणी त्यांची मिठागरे होती.सन १८७३ पासून त्यांनी मिठाची गोदामे बांधून मिठापासून मँग्नेशियम क्लोराईड बनवण्यासाठी पायोनियर मँग्नेशियम वर्क्स कारखाना चालू केला.नवरोजी पेस्तनजी अँड कंपनी ह्या नावाने ते मीठाचे वितरण करीत असत. त्यांना सॉल्ट बँरन म्हणून नाव पडले होते.व्यापारातून मिळालेल्या पैशाचा त्यांनी पारसी समाजासाठी धर्मशाळा, इस्पितळ बांधण्यासाठी विनियोग केला. त्यांच्या तीन दशलक्ष संपत्ती पैकी एक दशलक्ष संपत्ती चा विनियोग धर्मादाय कामासाठी केला. मुंबईतील पेटिट इस्पितळ, अहमदाबाद येथे डोळ्यांचे इस्पितळ, अंध अपंगासाठी फंड, मुकबधीरासाठी संस्था अश्या अनेक संस्थांना त्यांनी देणग्या दिल्या. अहमदाबाद प्रांतिक रेल्वेचे ते संचालक होते. [१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार दिनांक २५ जून २०२४