बकीबॉल
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bf/Buckminsterfullerene.svg/175px-Buckminsterfullerene.svg.png)
बकीबॉल हा कार्बनचा एक प्रकार आहे. कार्बनचे ६० अणू परस्परांशी बद्ध होऊन बकीबॉलचा रेणू तयार होतो. बकीबॉलच्या रचनेत कार्बनचे ६० रेणू, १२ पंचकोन व २० षटकोन अशा आकारात परस्परांशी जोडलेले असतात. हा आकार फूटबॉलसारखा असतो. या आकाराला 'ट्रन्केटेड आयकोसाहेड्रॉन' असे म्हणतात. बकीबॉल मध्यभागी पोकळ असून तो सहजतेने इतर अणू किंवा रेणूंबरोबर संबद्ध होत नाही.
शोध[संपादन]
![]() |
चित्र:Richard Smalley.jpg | |
हेरॉल्ड क्रोटो
|
रिचर्ड स्मॅले
|
बकीबॉलचा रेणू सर्वप्रथम इ.स. १९८५ साली हेरॉल्ड क्रोटो, जेम्स हिथ, सीन ओब्रायन, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॅले यांनी राइस विद्यापीठात तयार केला.[१] या शोधासाठी क्रोटो, कर्ल आणि स्मॅले यांना इ.स. १९९६ च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.