Jump to content

माउंट लिंकन, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट लिंकन
center}}
कॉलोराडो राज्यमार्ग ९वरून दिसणारे माउंट लिंकन हे शिखर
उंची
१४,२९३ फूट (४,३५६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स मध्ये ८वा
ठिकाण
पार्क काउंटी, कॉलोराडो, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
मॉस्किटो पर्वतरांग
गुणक
39°21′5″N 106°6′42″E / 39.35139°N 106.11167°E / 39.35139; 106.11167
पहिली चढाई
सोपा मार्ग
कॉलोराडो ९ ते काउंटी मार्ग ८, डिकॅलिब्रॉन


माउंट लिंकन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे.

या शिखराला अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे नाव देण्यात आले आहे.

मार्ग[संपादन]

अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून डिकॅलिब्रॉन या पायवाटेने माउंट ब्रॉस किंवा माउंट कॅमेरोनमार्गे शिखरापर्यंत जाता येते.

हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट ब्रॉस आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात.