Jump to content

मार्टिनिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्टिनिक
Martinique
फ्रान्सचा परकीय प्रदेश
ध्वज
चिन्ह

मार्टिनिकचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मार्टिनिकचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी फोर्ट-दे-फ्रान्स
क्षेत्रफळ १,१२८ चौ. किमी (४३६ चौ. मैल)
लोकसंख्या ३,८६,४८६
घनता ३४० /चौ. किमी (८८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-972
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
संकेतस्थळ martinique.pref.gouv.fr
मार्टिनिकचा नकाशा

मार्टिनिक (फ्रेंच: Martinique) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. मार्टिनिक बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या मुख्य भूमीपासून वेगळ्या ५ प्रदेशांपैकी एक आहे. मार्टिनिक फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपियन संघयुरोक्षेत्र ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. फोर्ट-दे-फ्रान्स ही मार्टिनिकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली मार्टिनिकची लोकसंख्या ३.८६ लाख होती. फ्रेंच ही येथील राजकीय भाषा व युरो हे अधिकृत चलन आहे.

मार्टिनिकचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने इ.स. १४९३ मध्ये लावला व १५ जून १५०२ रोजी तो येथे दाखल झाला. १७व्या शतकात सेंट किट्स येथे यशस्वीरीत्या वसाहत स्थापन केल्यानंतर फ्रेंच साम्राज्याने १६३५ साली मार्टिनिक बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. २८ मे १८४८ रोजी मार्टिनिकमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली. इ.स. १९०२ मध्ये येथील माउंट पेली ह्या जागृत ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मार्टिनिकमधील बहुतेक सर्व वस्ती नष्ट झाली. सुमारे ३०,००० लोक मृत्यूमुखी पडले. १९७४ मध्ये मार्टिनिकला फ्रान्सचा एक विभाग बनवण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: