Jump to content

वसंत पळशीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंत पळशीकर (१८ फेब्रुवारी, १९३६, हैदराबाद - २९ ऑक्टोबर, २०१६; नाशिक) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक- राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. नवभारत[१] आणि समाज प्रबोधन पत्रिका[२] या मासिकाचे ते संपादक होते. पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री- पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर[३] यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते. त्यांनी विविध नियतकालिकांत वेळोवेळी केलेले लेखन सुमारे तीन हजार पानांपेक्षा अधिक आहे.

पळशीकर यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला.[ संदर्भ हवा ] भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता. सन १९५९मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यात त्यांनी वेळोवेळी कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली होती. संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, दुसऱ्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला.[ संदर्भ हवा ]

राज्यात नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसाराचे मोठे काम त्पळशीकरांनी केले. हे करतांना पर्यावरण वाद हा विचार प्रवाह त्यांनी पहिल्यांदाच आपल्या लेखणीतून मांडला.[ संदर्भ हवा ] महात्मा गांधीचे विचार अत्यंत वेगळेपणाने दाखविण्याची त्यांची शैली अनोखी होती. ‘साधना’च्या संपादकीयमधून त्यांनी सोविएत रशियाची ५० वर्षे आणि घडामोडी यांचे विश्लेषण केले, ते सर्वत्र गाजले.[ संदर्भ हवा ]

पळशीकर यांच्या कार्याची माहिती देणारा एक लघुपटही आहे.

पुस्तके[संपादन]

  • चौकटी बाहेरचे चिंतन[४]
  • जमातवाद, राष्ट्र, धर्म आणि धर्मनिरपेक्षता
  • जिहाद, गुलाल आणि सारीपाट[५]
  • धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा[६]
  • परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा[७]
  • पारंपारिक आणि आधुनिक शेती
  • Role and Training of Development Activists.(सहलेखिका : कमला भसीन, लक्षी राव)[८]

वसंत पळशीकर यांच्याविषयीची पुस्तके[संपादन]

  • उमगत असणारे वसंत पळशीकर (लेखिका - डाॅ.मेदिनी डिंगरे)[९]

पुरस्कार[संपादन]

  • अनंत भालेराव स्मृति पुरस्कार
  • परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा पुस्तकाला 'शब्द'चा दुर्गा भागवत पुरस्कार[१०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ नाशिक, महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन वृत्त. "महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर".
  2. ^ विवेक, महाराष्ट्र नायक, गाथा कर्तृत्वाची, प्रगल्भ नेतृत्वाची. "समाज प्रबोधन पत्रिकेचे काम करता करता त्यांचा संबंध 'नवभारत' या मासिकाशी आला व या ठिकाणी म्हणजे वार्ईला ते मे. पु. रेगें यांच्याबरोबर काम करू लागले".
  3. ^ प्रहार, पळशीकरांची विचारझेप. "लोकशाही समाजवादावर त्यांची अढळ श्रद्धा होती. त्यामुळेच त्यांनी मार्क्‍सवाद, समाजवाद, फुले-आंबेडकरी विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे". 2023-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-08-31 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  4. ^ Magestic Readers. "Book available on Magestic Readers".
  5. ^ goodreads. "वसंत पळशीकरांची या संग्रहातून व्यक्त झालेलले हिंदू-मुस्लिम जातीयवादाची चिकित्सा तिच्या वेगेळेपणातून उठून दिसते".
  6. ^ फ्लिपकार्ट. "हे पुस्तक फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सध्या अनुपब्ध आहे". 2023-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-09-01 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  7. ^ रसिक.कॉम, rasik.com. "लोकवाङमय गृहने प्रकाशित केलेले हे पुस्तक रसिकच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे". 2023-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-09-01 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  8. ^ "कमला भसीन व लक्ष्मी राव ह्या सहलेखकांसोबत लिहिलेले हे पुस्तक". 2022-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-09-01 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  9. ^ ऐसी अक्षरे, aisiakshare.com. "उमगत असणारे वसंत पळशीकर".
  10. ^ एबीपी माझा, वेब टीम. "गेल्याच वर्षी वसंत पळशीकरांना शब्द पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 'परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा' या त्यांच्या पुस्तकाला 'शब्द'चा दुर्गा भागवत पुरस्कार देण्यात आला होता".

बाह्य दुवे[संपादन]

* वसंत पळशीकर ह्यांच्या निवडक लेखांचे संकलन