Jump to content

स्पृहा जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पृहा जोशी
जन्म स्पृहा शिरीश जोशी
१३ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-13) (वय: ३४)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१० ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मोरया
प्रमुख टीव्ही कार्यक्रम उंच माझा झोका
एका लग्नाची तिसरी गोष्ट
वडील शिरीष जोशी
पती
वरद लघाटे (ल. २०१४)
अधिकृत संकेतस्थळ http://www.kangoshti.blogspot.in

स्पृहा शिरीष जोशी ( १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्टएका लग्नाची तिसरी गोष्ट, इत्यादी मालिका आणि सूर नवा ध्यास नवा, किचनची सुपरस्टार कार्यक्रमांमध्ये चमकल्या. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.

स्पृहा जोशी या एक कवयित्री देखील आहेत. संगीत दिग्दर्शक कौशल इनामदारच्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.

स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरही असतात. 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 'सूर नवा ध्यास नवा' या 'रिॲलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर तेजश्री प्रधानची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मराठीतील असंख्य मान्यवरांसोबत "आठवणीतला खजिना" हा ऑनलाईन कार्यक्रम सादर केला.

कवयित्री स्पृहा जोशी[संपादन]

एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये कवयित्री दाखवलेली स्पृहा जोशी आपल्या जीवनात खरीच कवयित्री आहे.

स्पृहा जोशीचे कवितासंग्रह[संपादन]

  • चांदणचुरा
  • लोपामुद्रा : स्पृहा यांची चाहती असलेल्या नगरच्या गिरिजा दुधाट हिने या कवितासंग्रहाचे मोडीत लिप्यंतर केले आहे.

चित्रपट[संपादन]

  • मोरया
  • देवा

नाटके[संपादन]

  • अनन्या (एकांकिका)
  • युग्मक (एकांकिका)
  • ग म भ न (एकांकिका)
  • नेव्हर माईंड
  • पेईंग घोस्ट
  • बायोस्कोप
  • लहानपण देगा देवा
  • नांदी
  • समुद्र

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • अक्षरगंध प्रकाशनातर्फे कुसुमाग्रज पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
  • सर्जनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार २००३
  • साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार (११ मे २०१७)

बाह्य दुवे[संपादन]